पाचोरावासियांचे श्रावणातील कावड यात्रेने वेधले लक्ष

0

पाचोरा ;- पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथील त्रिवेणी संगमापासून पाचोरा शहरातील महादेव मंदिरापर्यंत काढण्यात आलेली कावड यात्रा लक्षवेधी ठरली. कावड यात्रा सेवा समितीने श्रावण महिन्यातील पावन पर्वावर या यात्रेचे आयोजन मागील वर्षांपासून सुरू केलेले आहे.

पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील मध्यवर्ती बांबरुड (महादेवाचे) येथे एकत्र येवून वाहत जाणाऱ्या गिरणा तितुर व गीलाटी या तीन नद्यांच्या संगमावरून संगमाचे पवित्र पाणी कावडमध्ये घेवून काढलेल्या कावड यात्रेत पाचोरा शहरातील शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. बांबरुड येथून निघालेल्या या यात्रेचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले.

उबाठा शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी निर्मल सिड्स जवळ स्वागत कमान उभारत यात्रेचे स्वागत केले. तर आमदार किशोर पाटील यांनी चिंतामणी कॉलनी जवळ भव्य शामियाना उभारत कावड यात्रेचे स्वागत केले . तसेच यात्रेकरूंना फराळाचे पदार्थ, चहा, पाणी वितरण करत कावड यात्रेत सहभाग घेतला. या यात्रेत अयोध्या येथील महंत विष्णुदास महाराज, भरत महाराज, आमदार किशोर पाटील यांचेसह यात्रा समितीचे किशोर संचेती, राहुल अग्रवाल, सागर पटवारी, विराज माथूरवैश्य, अशू शर्मा यासह पुरुष, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.