त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये… राज ठाकरेंचा मोदींना इशारा

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले आहेत, तसंच ब्रृजभूषण सिंग यांच्यावर कारवाई करण्यावर कुस्तीपटू ठाम आहेत. भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रृजभूषण चरणसिंग यांच्याविरोधात भारताचे कुस्तीपटू चांगलेच आक्रमक झाले आहेत. विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी त्यांना ऑलिम्पिकमध्ये मिळालेली मेडल गंगेमध्ये बुडवण्याचाही इशारा दिला होता.

मागच्या वर्षी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्या विरोधात आणि कुस्तीपटू यांच्या समर्थनार्थ आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या प्रकरणी सन्मानजनक तोडगा काढा आणि भारतीय क्रीडा जगताला आश्वस्त करा, अशी मागणी राज ठाकरे यांनी या पत्रातून पंतप्रधानांकडे केली आहे.

पत्राच्या माध्यमातून राज यांनी काय म्हंटले?

सन्मा. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, ज्यांचा गौरव आपण “देश की बेटियाँ” असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती’, असं राज ठाकरे पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहेत.

 

https://twitter.com/RajThackeray/status/1663886839906983937?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1663886839906983937%7Ctwgr%5E6a647443bef44017325d47462a5b75d2008689d6%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpublish.twitter.com%2F%3Fquery%3Dhttps3A2F2Ftwitter.com2FRajThackeray2Fstatus2F1663886839906983937widget%3DTweet

 

Leave A Reply

Your email address will not be published.