राहुल गांधींची आदिवासींना साद : आदिवासी नेत्याने सोडली साथ

पद्माकर वळवी यांचा भाजप प्रवेश

0

पद्माकर वळवी यांचा भाजप प्रवेश

मुंबई ;- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र काँग्रेसला मोठा झटका बसला असून नंदुरबार येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आदिवासी समाजाचा चेहरा असणारे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी भाजप प्रवेश केला. पद्माकर वळवी यांच्या भाजप प्रवेश हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. आदिवासी समाजाच्या मतांसाठी एकीकडे राहुल गांधी यांनी आदिवासी समाजाला साद घातलेले असतानाच एक आदिवासी नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याची टीका भाजपच्या नेत्यांनी केली आहे.

एकीकडे ‘जोडो’ दुसरीकडे ‘फोडो’
काँग्रेस नेते राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रे’निमित्त महाराष्ट्रात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते पद्माकर वळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाचा हात धरला आहे. एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत असतांना भाजपाने काँग्रेस फोडोवर काम केले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व ज्येष्ठ नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत वळवींनी पक्षप्रवेश केला.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.