लोकशाही न्यूज नेटवर्क
अयोध्येत राम लला आपल्या भव्य महालात विराजमान झालेत. राम मंदिरात सोमवारी प्राणप्रतिष्ठा होताच, राम भक्तांची 500 वर्षांची प्रतीक्षा संपली. अवधपुरी येथे उभा राहिलेल शानदार राम मंदिर फक्त एक इमारत नाही, त्यात भावना, समर्पण, त्याग, तपस्या नक्कीच आहेत. 500 वर्षांच्या संघर्षानंतर हे स्वप्न साकार झाले. भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्वसामान्यांसह खास लोकांनी देणगी दिली आहे. काहींनी कोट्यावधी तर, काहींनी लाखोंमध्ये देणगी दिली. मंदिर निर्माणमध्ये बऱ्याच जणांनी सहकार्य केलं.
अध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांनी मंदिर निर्माणासाठी सर्वाधिक देणगी दिली. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वेबसाईट नुसार, बापूंनी मंदिर निर्मला निर्माणासाठी 11.3 कोटी रुपयांचे योगदान दिले. अमेरिका, कॅनडा, आणि युनायटेड किंग्डम मधल्या त्यांच्या अनुयायांनी व्यक्तिगत पातळीवरही आठ कोटी रुपयांचा योगदान केले.