पुण्यात साॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

0

पिंपरी चिंचवड;- हिंजवडी परिसरात एका हॉटेलमध्ये आयटीआय अभियंता महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. वंदना द्विवेदी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ निगम याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वंदना आणि ऋषभ हे दोघेही लखनऊ येथील आहेत. ते हिंजवडी आयटी पार्क मध्ये नोकरीस होते. मागील दोन दिवसांपासून दोघेही हिंजवडी परिसरातील एका हॉटेलमध्ये राहत होते. दरम्यान ऋषभ याने वंदना यांचा रविवारी (दि. 28) पहाटेच्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला.

खून केल्यानंतर ऋषभ मुंबईच्या दिशेने जात होता. मुंबई पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये तो पिस्तुलासह आढळला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याने खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली. हा प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत (Hinjawadi) आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.