पुणे विमानतळावर साडेतीन कोटींच्या सोन्याची तस्करी

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढलं आहे. नुकतच पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी डीआरआयने ६ किलो सोन जप्त केलं आहे. तसंच सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे.

अलीकडे सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढलं आहे. नुकतंच पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी होत असल्याचं समोर आलंय. या प्रकरण डीआरआयने ६ किलो सोनं जप्त केलं आहे. तसंच सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे.

डीआरआयने लावला विमानतळावर सापळा
मुंबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला पुणे विमानतळावर येणार असल्याची माहिती डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानुसार पथकाने विमानतळावर सापळा लावला होता. दोघांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे सोने आढळून आले. त्यानुसार महिलेसह तिच्याबरोबर असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

६ किलो ९१२ ग्रॅम सोन जप्त
आरोपींनी ६ किलो ९१२ ग्रॅम वजन असलेल्या सोनं दुबईवरून तस्करी करून आणलं होत. ते सोन महसूल गुप्तचर संचालनायलाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केलं आहे. सोन्याची तस्कर करणाऱ्या या महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.