पुणे येथे चितोडे वाणी समाज, पुणे प्रगती प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्नेहसंमेलन उत्साहात

0

पुणे ;– चितोडे वाणी समाज, पुणे प्रगती प्रतिष्ठान (पूर्व विभाग) द्वारा आयोजित समाज बंधु भगिनींचे तिसरे स्नेह संमेलन नुकतेच २ जुलै, 2023 रोजी पुण्श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर हॉल, खराडी येथे मोठ्या उत्साहात व आनंदात झाले.

या स्नेह संमेलनाला खराडी, चंदननगर, वाघोली, हडपसर, मगरपट्टा सीटी, विमाननगर, लोहगाव, येरवडा, धानोरी, विश्रांतवाडी, दिघी परिसरातील समाज बांधव उत्स्फुर्तेने व मोठया संख्येने उपस्थित होते.

मंचावर मोहन बजाज, धिरज पाटील व रत्नाकर वाणी विराजमान होते. डॉ. मोहन बजाज यांनी अध्यक्षस्थान भूषिवले व चितोडे वाणी समाज, पुणे प्रगती प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कु.ऋतुजा अल्केश वाणी व सौ. कल्याणी गौरव वाणी यांनी सुञसंचालन केले.

नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने सौ. रजनी वाणी यांचे मार्गदर्शनाने बाळगोपाळांची वारकरी वेषात दींडीचे आयोजन केले होते. उपस्थित महिला पुरूषांनी यात सहभागी होउन दिंडीची शोभा वाढविली. दिंडी स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण ठरले.मध्यांतरा दरम्यान सर्वांनी सुरूची सहभोजनाचा स्वाद घेतला.

दुपारच्या सत्रात विविध गुण दर्शन मध्ये बालकांनी रंगीबेरंगी वेषभुशा करून छान सादरीकरण केले. सादरीकरण चालू असतांना उपस्थितांना देखील तालावर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. बालकांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी विविध खेळांचे आयोजन केले. याला पण भरभरून प्रतिसाद मिळाला.राजेंद्र खारूळ यांनी कार्यास मोलीक अर्थ सहाय्य व सक्रीय सहभाग करणारांचे तसेच इतर सर्व संबंधितांचे आभार प्रदर्शन केले. भास्कर ठकार, श्रेयम अकोलेकर व रत्नाकर वाणी यांनी सामुहिक पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

दरम्यान चितोडे वाणी समाज, पुणे प्रगती प्रतिष्ठानच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त २३ जुलै २०२३ला खराडीला आयोजित रक्तदान शिबिराच्या अनुषंगाने जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक संतोष अंगोळकर यांनी रक्तदानाचे फायदे व महत्व विषद करीत जनजागृती केली.

चितोडे वाणी समाज पुणे प्रगती प्रतिष्ठानच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त 23 जुलैला खराडीला जीवन ज्योत हॉस्पिटल खराडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दोन्ही कार्यक्रमाचे स्आयोजक रत्नाकर वाणी, राजेश खारुळ ,तुषार अट्रावलकर, श्रीराम अकोलेकर ,अमित यावलकर ,वैभव अकोले ,पंकज गाडे ,अल्केश वाणी, विकास वाणी, स्वप्नील अकोले ,अंकुश वाणी, गौरव वाणी (अट्रावलकर ) सौ स्मिता राजेंद्र खारुळ ,सौ मयुरी प्रसाद वाणी, सौ वर्षात तुषार अट्रावलकर , सौ दर्शना विकास वाणी, सौ स्वाती अलकेश वाणी ,सौ अमृता स्वप्निल अकोले ,सौ रजनी रत्नाकर वाणी, सौ कल्याणी गौरव वाणी व कुमारी ऋतुजा लकेश वाणी आदींचे सहकार्य लाभले. दरम्यान समाज बांधवांनी वर्षभरात किमान एक वेळा तरी सहपरिवार आपल्या व्यस्त दिनचर्यातून एक दिवस एकत्र यावे ,गाठीभेटीतून नातीगोती समृद्ध करावी ,सुखदुःखाच्या गोष्टी व्हाव्यात आणि स्नेहभोजनाचा आनंद घेऊन हसत खेळत दिवस साजरा करावा अशा भावना व्यक्त करण्यात आल्या .

Leave A Reply

Your email address will not be published.