‘मन की बात थेट दिल से तू जानले’ आज ‘प्रपोज डे’

0

रजनीकांत पाटील, लोकशाही न्युज नेटवर्क 

 

पूर्वी एखादी व्यक्ती आवडत असेल तर, ‘तू मला आवडते’ हे सांगण्यासाठी प्रियकर प्रेमपत्र, चिठ्ठीचा किंवा लव्हलेटर लिहत असे आणि ते कुणाच्या तरी माध्यमातून देत असे. मात्र काळाच्या ओघात ही पद्धत खूप मागे पडली. आता तर हायटेकच्या जमान्यातुन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘प्रपोज’ करण्याचा तरुणाईवर भर दिसून येत आहे. तऱ्हा कुठल्याही असो मात्र सर्वांची प्रेमाची भावना सारखीच असते. अगदी त्या ओळींसारखी ‘प्रेम हे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते’.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘रोज डे’ झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे 8 फेब्रुवारी ‘प्रपोज डे’ रोजी हा दिवस साजरा केला जातो. प्रपोज डे ची सुरुवात पाश्चिमात्य देशांमध्ये झाली, त्यानंतर जगभरात सर्वत्र आपल्या आवडत्या व्यक्तीला आधुनिक पद्धतीने प्रपोज केले जाऊ लागले. प्रेम वीरांना प्रतीक्षा असते ती ‘प्रपोज डे’ ची. आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी प्रेमात पडलेले लोक या दिवसाची वाट पाहतात.

आजच्या काळातील प्रपोज करण्याच्या नव्या पद्धती

विविध ऍप्स, व्हिडीओच्या माध्यमातून भावना मांडणे, मेसेजेस,फेसबुक, व्हाट्सएप, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शब्द नव्हे तर स्टिकरच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या जातात.

कुणावर ही फोर्स नको

प्रपोज करणे म्हणजे मनातील भावना समोरच्याला सांगणे. मात्र समोरच्या व्यक्तीला ती भावना ऐकून घ्यायची नसेल किंवा ती व्यक्ती कुठल्या कामात व्यस्त असेल तर फोर्स करण्याची आवश्यकता नाही. आवडत्या व्यक्तीला समजून घेणे महत्वाचे असते. जर पुढील व्यक्तीकडून नकार आला तर पचवण्याची तयारी हवी. एका नकारामुळे आयुष्य उध्वस्त होत नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. ‘प्रेम जीव लावायला शिकवते, जीव घ्यायला किंवा द्यायला नाही’ हे विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.