जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात नव्याने निष्पन्न होणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 71 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 90 जणांनी कोरोनावर मात केलीय.
होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 1323 इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98.18% इतका आहे. नवीन कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचं प्रमाण दुप्पट आहे.
असे आढळले बाधित
जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण 71 कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात 14, जळगाव ग्रामीण 01 , भुसावळ 08, अमळनेर 03, चोपडा 14, पाचोरा 02, भडगाव 08, धरणगाव 02, जामनेर 05, रावेर 02, पारोळा 02, चाळीसगाव 07, मुक्ताईनगर 03.