शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अन् काँग्रेस पक्षावर लक्ष – प्रा. सुभाष पाटिल

0

रजनीकांत पाटील, अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यात अनेक पक्षांचे कार्यकर्ते होऊन गेले. अनेक पक्षामध्ये पैसा कमवण्यासाठी पद भूषवतात,  हेराफेरीची भूमिका निभावतात.  ‘ज्या पक्षात मनी त्या पक्षाचा मी धनी’ अशी अनेक भूमिका बदलणारे अनेक नेते पक्षाचे पदाधिकारी आपण पाहिले असणार पण आजही बळीराजा चिंतेत आहे. आज शेतकऱ्यांच्या विषयावर बोलण्यासाठी न्यायासाठी शेतकऱ्यांना आंदोलने आणि मोर्चा काढावे लागतात. जिल्ह्यात आपल्या अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढे सरसावणारा लाभलेला एक पुढारी नव्हे एक कार्यकर्ता शेतकरी पुत्र आपल्या गावाचा एक ज्येष्ठ नेता प्राध्यापक सुभाष पाटील या व्यक्तीने स्वतःच्या प्रयत्नाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक जनतेची कामे करून दाखविली. पण आजपर्यंत कुणापुढेही बोलून दाखवली नाही.

तालुक्यात पिक विम्यासाठी विमा कंपन्यापर्यंत प्रश्न मांडले. अतिृष्टीमुळे नुकसाभरपाई मिळावी याबाबत तहसीलदार पासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वेळोवेळी स्वतः जाऊन निवेदने दिली. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी प्रश्न थेट घरापर्यंत जाऊन सोडविण्याचं काम केलं, मग तो कुठल्याही गावचा असो.  शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.  त्यांनी गावात सरपंच, विकास सो चेरमन तर कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत पदे भूषवली. तर तालुक्यातील आजपर्यंत मोठा संपर्क निर्माण केला. एकजुटी केली. एवढेच नव्हे तर पारोळा किसान कॉलेजला ३० वर्षांपासून प्राध्याक म्हणुन कार्यरत आहे. आज विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची भूमिका निभावत आहेत. असंख्य तरुणांचे भविष्य घडविले.

विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या अडचणी संदर्भात निराकरण करण्यासाठी ते नेहमी सरावतात. प्राचार्यापासून तर संचालक मंडळापर्यंत जाऊन पोहोचतात.  तेवढेच नव्हे तर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना वृद्ध, अपंग, व्यक्ती यांच्यासाठी काय सोय करता येईल. यांना कुठल्या योजनेचा लाभ मिळू शकेल. पेन्शन अपंगतत्वाचा पगार मिळणारा बेनिफिट या कार्याची देखील त्यांनी मोठ्या प्रकारे धुरा सांभाळली आहे. त्यांनी प्राध्यापक असून देखील आज ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षात किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत करत आहे.

मागील काळात काँग्रेसने कितपत कामे केली. काँग्रेस कसे होते, काँग्रेसने काय केले, काँग्रेस पक्षाची भविष्यातील कामगिरी कशी असणार आहे. तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी काँग्रेस काय करेल कितपत योग्य ठरेल. हे जनतेला पटवुन दिले.  अमळनेर तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांचे मोठे प्रयत्न चालू आहे. आजही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झटणारा, शेतकऱ्यांची बाजू मांडणारा, शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम इमानदारीने करतात. इतकेच नव्हे तर पदावर असताना शांतता, संयमीपणा, वागणूक, जनतेशी संवाद कसा साधावा. राजकारणातील खरा इतिहास काय असतो. याबाबत त्यांच्याकडून ‘बोध’ घेण्यासारखा आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.