आयुष्याची व्हावी गाथा..

0

‘देवाने चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला हजार बोट’ द्यावी असे भालचंद्र नेमाडे नेहमी म्हणतात. पण एकविसाव्या शतकात जिथं मस्तक ठेवावे असे चरण मिळणे दुर्लभ, धर्म, जाती, भोंगे, अजान, हनुमान चालीसा या गर्दीत गुंतलेल्या राजकारणात असा एखादा कोहिनूर सापडणे अति मुश्किल. स्वार्थी राजकारणाच्या रथाचे घोडे सर्वदूर घोडदौड करत असताना जळगावच्या सुवर्णनगरी एक अस्सल पांढराशुभ्र सोनं आज उगवू पाहत आहे. मुळात राजकारणाच्या दलदलीत एखाद्या पांढऱ्याशुभ्र कमळाने आपल्या वेगळ्याच आनंदात डोलाव असं एक व्यक्तिमत्व जळगाव भूमीला लाभलंय. तारुण्याच्या उंबरठ्यावर सामाजिक जाणीवांचे भान असणाऱ्या, शिवसेना प्रमुख स्वर्गीय श्री. बाळासाहेब ठाकरेच्या मनातला शिवसैनिक म्हणजे जळगाव जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील.

कुण्या एका हिंदी शायर ने म्हटलंय

उठो तो ऐसे उठो, फक्र हो बुलंदी को भी
झुको तो ऐसे झुको, बंदगी भी नाज़ करे

या उक्तीप्रमाणे कर्तुत्वाची श्रीमंतीची सर्वोच्च उंची पण त्यासोबतच सर्व सद्गुणांचा पाया असलेला विनम्रता हा गुणधर्म या दोन अलंकारांनी अलंक्रुत असे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रताप रावजी पाटील. ज्यांच्या आयुष्याची गाथा व्हावी एवढी उंची ह्या तरुण राजकारण्याने आज गाठली आहे. पाळधी परिसरातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून प्रतापराव पाटील ओळखले जातात. खरं तर ही ओळख राजकीय वारसामुळे नव्हे तर त्यांच्या कर्तुत्वाने प्राप्त झालेली आहे.

मतदारसंघात कुठेही लग्नकार्य असो की मरण धरण असो प्रतापरावजी पाटील आवर्जून प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. शिक्षण, पाणीपुरवठा, निवारा,विज, महिला सबलीकरण यासारख्या विषयांच्या विकासकामांवर प्रतापराव पाटील यांचा नेहमीच भर असतो. जेव्हा आपल्या घरात सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग असेल आणि प्रतापराव आले नाहीत असं मतदार संघात क्वचितच घडावं. घरात असलेला राजकीय वारसा पाळधी गावापासून त्यांच्या कर्तृत्वाची झालेली सुरुवात आज जिल्ह्याच्या सीमेपर्यंत येऊन ठेपली आहे आणि खऱ्या अर्थाने प्रतापरावांच्या रूपात महाराष्ट्राच्या राजकारणावर नव्या सूर्योदयाचा उदय होत आहे.

लवकरच विधानपरिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत पण तत्पूर्वीच सर्वसामान्य तरुणांच्या मनातून त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रतापराव पाटील यांच्या नावाला पसंती दिली जात आहे. आणि प्रत्येकाला खात्री आहे की विधानपरिषदेवर आमदार म्हणून आपल्या लाडक्या नेत्याला ते बघतील. आयुष्य चंदनासारखा झिजावं आणि आपल्या अस्तित्वाने हजारोनच आयुष्य उजळून निघावं तो खरा माणूस आणि याच प्रमाणे सर्व सामान्य लोकांसाठी दिसणारे प्रतापराव नक्कीच आमदार होताना सर्व जनतेला आवडेल आणि हा जनमताचा कौल सर्व जळगाव जिल्हा आज मनोमन अनुभवतोय. काही शैक्षणिक कामानिमित्त प्रतापरावांसोबत सोबत संपर्क आला, जिल्हा परिषदेच्या निधीतून वेगवेगळ्या विकास कामांना प्राधान्य देणारे प्रतापराव आपल्या असामान्य व्यक्तिमत्वने आणि वागणुकीने कधी प्रतापदादा होऊन ह्या काळजात घर करून गेले कळलंच नाही.

राजकीय मंचावरून अभ्यासपूर्ण भाषण करणारे प्रतापदादा, आपल्या अनोख्या शैलीने युवा शिवसैनिकांना आकर्षित करणारे प्रतापदादा, वर्ल्ड विजन इंडिया सारख्या संस्थेच्या माध्यमातून गरीब आर्थिक दुर्बलांना मदत करणारे प्रतापदादा, आई-वडील नसणारे अनाथ लेकरांना शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेणारे प्रतापदादा, कोरोनाच्या काळात स्वतः मैदानात उतरून कोविडि सेंटर चालवणारे प्रताप दादा, गावात किंवा मतदार संघात कोणाचा मृत्यू झाल्यावर अंतयात्रेचे साहित्य घेऊन येणारे प्रतापदादा, रोटरी क्लबचा युवा गौरव पुरस्कार प्राप्त असणारे प्रतापदादा, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याच्या लग्नात अतिशय आनंदाने संगीताच्या तालावर थिरकणारे प्रतापदादा, कामात कसूर केल्याबद्दल आपल्या कणखर वाणीने अधिकाऱ्यांना घाम फोडणारे प्रतापदादा, माझ्या मतेतर ज्या धर्मवीर आनंदराव दिघे साहेबांना तुम्ही आपण सर्वजण मनामध्ये मिरवतो त्या दिघे साहेबासारखं जडण घडण असणार व्यक्तिमत्व म्हणजे प्रतापदादा.

ऐन तिशीतल्या या तरुण राजकारण्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अनोखा असा ठसा उमटवून निश्चयाचा महामेरू पार केलाय. आपल्या उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे निष्कलांकित राजकारणी ज्यांची प्रगती हे द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे उत्तरोत्तर वाढत आहे आणि अशीच अखंड वाढत राहील, हजारो आयुष्याच सोनं करणाऱ्या अशा पारसरुपी व्यक्तिमत्वाला प्रकट दिनाच्या आभाळभर शुभेच्छा..

माननीय दादासाहेब खूप जगा, खूप मोठे व्हा, नेहमी आनंदी राहा आणि आमच्या तरूणाईच्या मनावर असेच अबाधित पणे आपल्या कर्तुत्वाने राज्य करत राहा. ह्या प्रकटदिनी तुमच्या पुढील वाटचालीसाठी शेवटी एवढच सांगेल …

वृक्ष हों भले खड़े,
हों बड़े, हों घने,
एक पत्र छाँह भी
मांग मत! मांग मत! मांग मत!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!
तू न थकेगा कभी,
तू न थमेगा कभी,
तू न मुड़ेगा कभी,
कर शपथ! कर शपथ! कर शपथ!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!
यह महान दृश्य है,
देख रहा मनुष्य है,
अश्रु, स्वेद, रक्त से
लथ-पथ, लथ-पथ, लथ-पथ,
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

– सचिन पाटील
प्राचार्य, GPS स्कूल, पाळधी

Leave A Reply

Your email address will not be published.