प्री – वेडिंग द्वारे होणारे बीभत्स प्रसारण थांबवा- प्रशांत ढोरे पाटील

0

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क

आजकाल लग्न समारंभ म्हटले म्हणजे प्री- वेडिंग शूटिंग आलंच, प्रि-वेडिंग हे भारतीय विवाह संस्कृतीला लागलेलं ग्रहनच म्हणता येईल. एखादया बॉलिवूडच्या रोमँटिक चित्रपटातील अभिनेता, अभिनेत्रीला ही लाजवेल अशा अभिनयाचे प्रि-वेडिंग व्हिडीओ बघितले की वाटत आहे. पूर्वी विवाह सोहळा आटोपल्यावर देखील आठ – पंधरा दिवस नवरदेव नवरी एकमेकांशी साध बोलत ही नव्हते इतकी जवळीक तर दूरच, भारतीय विवाह संस्कृती नुसार लग्न विधी झाल्यावर देवदेवतांचे पूजन व आशीर्वाद घेऊनच नवं दांपत्य विवाह जिवनाची खरी सुरवात करत असत, परंतु आजकाल तर सोयरीक झाल्याबरोबरच लग्नाची खरेदी असो किंवा प्रि-वेडिंग शूटिंगच्या नावावर तर चार चार दिवस पर्यटन स्थळी नवरदेव नवरी फिरायला जात आहेत. लग्नानंतरचे सर्व संस्कार विधी बहुदा लग्नाआधीच उरकल्या जातात की काय देव जाणे असं प्रि- वेडिंगच्या व्हिडिओ वरून तरी वाटतं असून खाजगीत सर्रास प्रि – वेडिंग विषयी नकारार्थीच प्रतिक्रिया येत आहेत.

लग्नविधीपूर्वी स्क्रीन वर दिसणारे प्री- वेडिंगचा परिणाम आजच्या किशोरवयीन मुलामुलींवर होत असून त्यांचे पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण भविष्यात खूपच वाढत जाईल अशी चिंता व्यक्त केल्या जात असून दोष त्यांचा नसून ते अनुकरणशील असतात त्यांच वयच नासमज असत म्हणून आपणच सामाजिक भान ठेवणे गरजेचे आहे.

लग्नातील प्री – वेडिंग प्रदर्शन हे खाजगी आयुष्य सार्वजनिक करणे नादान अल्पवयीन संस्कारक्षम मुलांसाठी खूपच घातक असून कुठेतरी हे थांबवायला हवं, लग्न सोहळ्याच्या विधीला वेळ असतो त्यावेळेस विवाहस्थळी मोठमोठ्या स्क्रीन वर हे प्रि-वेडिंगच्या नावावर नको नको ते प्रदर्शन नाईलाजाने का होईना वऱ्हाडी मंडळींना बघावच लागत आहे, त्यातील बहुतांश सेमी बोल्ड सिन बऱ्याचदा वयस्कर मंडळींना बघून न बघिल्यासारखं केल्या शिवाय पर्यायच उरत नाही, म्हणून भूतकाळातील गोड आठवणी, प्रेरणादायी क्षणचित्रे जरूर संग्रहीत ठेवा हवं तर दाखवा परंतु नववधू वरांनी नात्यातील तारुण्याचा जिव्हाळा असलेलं आकर्षण लग्न होईपर्यंत तरी व्हर्जिनिटी सारख जपावं व प्रि-वेडिंगच्या नावावर भारतीय विवाह संस्कृतीला लागलेल्या ग्रहणापासून वाचव व आपले खाजगी आयुष्य सार्वजनिक करणे टाळा असं कळकळीच आवाहन रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.