भुसावळात लॉजवर पोलिसांचा छापा; पाच महिलांसह पाच ग्राहक ताब्यात

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ शहरातील पांडूरंग टॉकीज जवळील आनंद लॉजमध्ये भुसावळ पोलीसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिलांसह ग्राहकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना भुसावळ येथील पांडूरंग टॉकीजजवळील आनंद लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारे आज २१ मार्च सोमवार रोजी सकाळी भुसावळ पोलीसाच्या पथकाने या लॉजवर अचानक छापा टाकला.

यावेळी लॉजवर पोलीसांना पाहून खळबळ उडाली. वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिला आणि पाच ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बेकायदेशीर व अनैतीक व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.