वीजेच्या धक्क्याने वृध्दाचा मृत्यू; अकस्मात मृत्यूची नोंद

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

म्हसावद येथील वृध्दाचा विजेच्या धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लोटन देवराम महाजन (वय ६०) असे मयत वृध्दाचे नाव आहे.

लोटन देवराम महाजन हे जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रहिवाशी असून ते कुटुंबियांसह राहतात. महाजन हे शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवार १९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते गुरांना चारा कापण्यासाठी म्हसावद शिवारातील शेतात गेले होते. त्यावेळी शेतातील चारा कापत असतांना बाजूला पडलेल्या विद्यूत तारेचा त्यांना जोरदार धक्का बसला. यामुळे त्यांचा जगीच मृत्यू झाला.

दरम्यान त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. खातीना पठाण यांनी मयत घोषीत केले. रविवारी २० मार्च रोजी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.