केसीई महाविद्यालयाचा खेळाडू आकाश धनगरची कबचौ विद्यापीठ संघात निवड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा खेळाडू आकाश धनगर यांची २५ ते २७ मार्च २०२२ दरम्यान विवेकानंद ग्लोबल विद्यापीठ, जयपूर येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी कबचौ विद्यापीठ संघात निवड करण्यात आली आहे.

आकाश धनगर याचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक राणे, उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, विभागप्रमुख प्रा. निलेश जोशी, प्रा. प्रविण कोल्हे, प्रा. अतुल गोरडे,प्रा. पंकज पाटील तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.