२ हवाईदलाच्या विमानांचा अपघात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) २ हवाईदलाच्या विमानांचा अपघात झाला आहे. राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उचैन पिंगोरा येथे लष्कराचे विमान कोसळले. विमान क्रॅश होऊन आग लागली. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे.

तसेच मध्य प्रदेशातील मुरैना येथे आज २८ जानेवारी शनिवारी सकाळी मोठा अपघात झाला. ज्यात हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-३० (Sukhoi-30) आणि मिराज २००० क्रॅश झाली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. सोबतच पुढील कारवाई केली जात आहे. या दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते, जेथे सराव सुरू होता. पहाटे साडेपाच वाजता हे विमान कोसळले. दरम्यान दोन्ही वैमानिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.