उत्राणच्या फोटोग्राफरचा कार अपघातात मृत्यू

0

लोकशाही न्युज नेटवर्क
मित्रांसोबत नाशिक येथे गेलेल्या एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील तरुण फोटोग्राफर कृष्णा दामू भोई (३२) याचा अपघातात मृत्यू झाल्याची मालेगाव साकूर फाट्याजवळ घटना घडली आहे.

कृष्णा दामू भोई (३२) हा व्यवसायानिमित्त मित्रांसोबत नाशिक येथे गेला होता. तेथील काम आटोपून तो कारने उत्राणकडे येत होता रात्रीच्या सुमारास साकूर फाट्याजवळ कार अचानक नाल्यात जाऊन कोसळली. यात कृष्णा हा जखमी झाला. त्याला मालेगाव येथे दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मित्रांना चाळीसगावी उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. कृष्णा हा एकुलता एक मुलगा होता. . त्याच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, दोन बहिणी, पत्नी व दोन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.