पिंपरूड येथे अवैध दारू विक्रीविरोधात महिला आक्रमक

0

फैजपूर / लोकशाही न्यूज नेटवर्क

पिंपरूड येथे अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षकांना महिलांनी दिले असून कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
पिंपरुड ता. यावल येथे अवैध गावठी दारूच्या सर्रासपणे होत असलेल्या विक्री मुळे गावात भांडण तंटे, सामाजिक व पारिवारिक वातावरण कलुषित करणारे वाद हे वाढीस लागले होते. तरुण पिढी व्यसनाधीन झाल्यामुळे बेरोजगारी व अकाली मृत्यू चे प्रमाणही चिंताजनक होत होते. गावातील महिलांना होणारा त्रास व समस्या जाणून गावाच्या कार्यतत्पर व राज्य स्तरीय नारीरत्न पुरस्कार विजेत्या महिला सरपंच मंगला योगेश कोळी, ग्रामपंचायत सदस्या सौ खुशाली जितेंद्र जंगले यांनी पुढाकार घेऊन गावातील महिलांच्या सोबतीने फैजपूर पोलिस स्टेशनचे स.पोलीस निरिक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांना निवेदन दिले.
यावेळी स.पोलीस निरिक्षक आखेगावकर यांनी उपस्थित महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या. आणि कडक कारवाईचे आदेश दिले. यावेळी पिंपरुड गावचे पोलिस पाटील श्री हरिष चौधरी, सामाजिक कार्यकर्ते श्री योगेश कोळी, जितेन्द्र जंगले, भैय्या पाटील व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.