पाचोरा / लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे आज २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता “स्मृतीगंध” या एकदिवसीय व्याख्यानाचे आयोजन शहरातील भडगाव रोडवरील शेठ मुरलीधर मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात करण्यात आले आहे
. या व्याख्यानात सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड ह्या “मला भेटलेल्या लेकी सुना” या विषयावर व्याख्यान करणार आहेत. व्याख्यानास प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मा. आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, मानद सचिव अॅड. महेश देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानाचा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी यांनी केले आहे.