पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त ? पाहा आजचा भाव

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Crud Oil) किंमतीत चढ-उतार होत आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे सरकारने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील अतिरिक्त कर कमी केला. यानंतर देशांतर्गत बाजारातही तेलाच्या किमती कमी झाल्याचा अंदाज बांधला जात होता. पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel) हे कच्च्या तेलाच्या दरांवर आधारभूत असतात.

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल केलेला नाही. गुरुवारी जाहीर झालेले पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही.

आज सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 106.6 डॉलर इतकी होती. तर WTI प्रति बॅरल 102.3 डॉलरवर विकली जात होती. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी क्रूडच्या किमती प्रति बॅरल 140 डॉलरच्या वर गेल्या होत्या. आता क्रूड 100 डॉलरच्या जवळ असताना, आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

 आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

जळगाव –  पेट्रोल 107.50 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.02 रुपये प्रति लीटर.

मुंबई – पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर.

दिल्ली – पेट्रोल दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई – चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर.

कोलकाता – पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये.

 

Leave A Reply

Your email address will not be published.