मोठी घोषणा: आजपासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

पेट्रोल डिझेलचे हे स्वस्त दर आज शुक्रवार दि. 15 सकाळी 6 वाजेपासून देशभरात लागू होणार आहेत. त्यामुळे देशभरातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी ट्विटरवर (एक्स) या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी घट करुन एकदा पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, मोदींचं कोट्यवधी भारतीयांच्या परिवाराचं हित आणि सुविधांवर लक्ष्य आहे. जग सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलच्या दरात 50 ते 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि आपल्या आजूबाजूच्या अनेक देशांना पेट्रोल मिळणंच बंद झालं आहे.

गेल्या 50 वर्षात इतकं मोठं तेल संकट कधीच उद्भवलं नव्हतं तशी परिस्थिती आता आहे. असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि चांगल्या नेतृत्वामुळे मोदींच्या या निर्णयाला कोणतीही अडचण आली नाही”, असं हरदीप पुरी म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.