मोठी घोषणा.. पेट्रोल, डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झाले स्वस्त

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने (State Govt) घेतला आहे. राज्यात आता पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) दरावरील व्हॅट कमी (VAT Reduce) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज कॅबिनेटच्या बैठकीत काही लोकहिताचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत राज्यातील पेट्रोल – डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. पेट्रोल – डिझेलचे दर कमी केल्याने राज्यातील मालवाहतूकीचा खर्च कमी होऊन महागाई काही प्रमाणात कमी होणार आहे. पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लीटर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडणार आहे. केंद्र सरकारने कर कपात केल्यानंतर राज्यांनी देखील करात कपात करावी असे आवाहन केले होते. काही राज्यांनी याला प्रतिसाद देत कर कपात केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील राज्याच्या करात कपात केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.