पेट्रोल पंपाच्या हिशोबात अपहार ; आरोपीला अटक

0

जळगाव : पेट्रोलपंपावर काम करत असताना तेथील हिशोबातून १ लाख २ हजार ७०९ रुपयांचा अपहार करीत पसार झालेला योगेश काळू राठोड (रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

शिरसोली रस्त्यावरील पेट्रोलपंपावर योगेश राठोड हा काम करीत होता. दरम्यान, दि. ८ ऑगस्ट २०२३ – ते १० ऑगस्ट २०२३ या दरम्यान योगेश राठोड याने – पेट्रोलपंपाच्या हिशोबातून १ लाख २ हजार ७०९ – रुपयांचा अपहार केला होता. या प्रकरणी एमआयडीसीपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून योगेश राठोड हा फरार होता,

तो दि. ३ एप्रिल रोजी सुभाषवाडी येथे आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार रात्री पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ जितेंद्र राठोड, पोहेकॉ समाधान टहाकळे, शुध्दोधन ढवळे, साईनाथ मुंढे यांच्या पथकाने संशयित राठोड याला अटक केली. त्याला गुरुवार दि. ४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता न्या. वसीम देशमुख यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. स्वाती निकम यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.