पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दि. 8 सप्टेंबर रोजी जळगाव येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी संविधान आर्मी विविध 10 संघटनेचे जिल्हा नियोजित बैठक संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष, पि.आर.पि प्रदेश उपाध्यक्ष, मा. नगरसेवक जगन सोनवणे व भुसावळ नगरसेविका पुष्पा सोनवणे, मा. पंचायत समिती सदस्या यांनी भुसावळ पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान एकाच दिवशी कॅप्चर करुन मराठा आरक्षण लागु करो वरना खुर्ची खाली करो या शिर्षकाखाली हे रेल रोको दि. १५ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. हे करो या मरो या पध्दतीने हे तिव्र स्वरुपाचे आंदोलन असेल. तसेच दि.०६ डिसेंबर २०२३ रोजी दादर रेल्वे स्टेशनवर हे रेल रोको आंदोलन, मराठा आरक्षण, व दादर चैत्यभुमी रेल्वे स्टेशन या नामांतरासाठी व इव्हीएम हटाव, बॅलेट पेपर लावो, खाजगीकरण नही चलेगा, जालना लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्री, देवेद्र फडणवीस राजीनाम दो.. या मागण्या घेऊन हे तिरंगा रेल रोको आंदोलन होईल अशी माहिती दिली.

जिल्हा बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघातुन कामगार नेते जगन सोनवणे तर, जळगाव लोकसभा मतदार संघातुन नगरसेविका मोलकरीण नेत्या, पुष्पा जगन सोनवणे यांची उमेदवारी दोन्ही, लोकसभा मतदार संघातुन जाहीर केली. भुसावळ विधानसभा मतदार संघातुन कामगार नेते जगन सोनवणे हे उमेदवार असतील असा ठराव जिल्हा समितीच्या विविध १० संघटनांच्या संयुक्त बैठकीत एकमताने मंजुर करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.