पिंप्राळ्यात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे रविवारी अनावरण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, लोक संघर्ष मोर्चा, संभाजी ब्रिगेड, छावा मराठा प्रीमियर लीग, बुलंद छावा, मराठा महासंघ यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरचा उंच व भव्यदिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा महानगर पालिका निधी व काही अंशी लोक वर्गणीतून जळगाव येथील पिंप्राळा भागात उभा करण्यात आला आहे. या बाबत आम्ही सर्व संघटना महानगर पालिका व ज्यांच्या संकल्पनेतून हा पुतळा उभा राहिला आणि ज्यांनी लोक वर्गणी साठी मेहनत घेतली त्या उपमहापौर कुलभूषण पाटील व सर्व देणगी दारांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

तसेच हा पुतळा बनवणारे मूर्तिकार व चबुतरा बांधणारे श्रमिक यांचे देखील आभार मानण्यात आले . जळगाव शहरातील हा दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असून हा पुतळा 20 फूट उंच व चबुतरा 15 फूट उंच असा एकूण 35 फूट उंच असून 5000 स्क्वेअर फुट मध्ये हा पुतळा उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न व रयतेचे राज्य ही संकल्पना कायम स्मरणात राहवे आणि सर्वांना आपल्या ह्या थोर राज्याला बघून राष्ट्राच्या प्रति खरी निष्ठा व सर्वसमावेशक राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे महाराजांचे कार्य असेच पुढे चालू ठेवण्याची प्रेरणा त्यातून मिळावी या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दिनांक 10 सप्टेंबर 2023 रविवार रोजी सकाळी 11 वाजता अनावरण  होणार आहे. या अनावरण  सोहळ्याला जिल्ह्यातील सर्व छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या शिवप्रेमींनी उपस्थित राहावे तसेच शहरातील सर्व शिव प्रेमींनी अगदी वाजतगाजत या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पिंप्राळा येथे उभारण्यात आलेला हा पुतळा आपल्या जळगाव करांची मान उंचावणारा बाब आहे आणि म्हणून यात कुठेही राजकारण होवू नये. सर्वांनी ह्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी व्हावे आपल्या राजकीय मतप्रवाह यात आणला जावून राजकारण ही करू नये असे आवाहन जनसंघटनेने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.