Pegasus Effect.. अधिकाऱ्यांसाठी कार्यालयात मोबाइल आचारसंहिता लागू; राज्यसरकारचा आदेश

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशात पेगासस हेरगिरी प्रकरणामुळे गरमागरमीचे वातावरण आहे. या दरम्यान महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी आपल्या कर्मचार्‍यांना म्हटले की, कार्यालयीन वेळेत मोबाइल फोनचा वापर कमीत कमी करा, लँडलाईन फोन सर्वात चांगला आहे. सामान्य प्रशासन विभाग (जीएडी) द्वारे जारी एका ओदशात म्हटले आहे की, ऑफिशियल कामासाठी आवश्यक असेल तरच मोबाइल फोनचा वापर केला पाहिजे. पेगासस प्रकरणामुळे सध्या राजकीय वातावरण ‘गरम’ आहे.

आदेशात म्हटले आहे की, कार्यालयात मोबाइल फोनचा अंदाधुंद वापर सरकारची प्रतिमा बिघडवतो.  जर मोबाइल फोनचा वापर करायचा असेल तर टेक्स्ट मेसेजचा जास्त वापर केला पाहिजे आणि या उपकरणांद्वारे चर्चा कमी झाली पाहिजे. कार्यालयीन वेळेत मोबाइल उपकरणांच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर मर्यादित झाला पाहिजे.

‘आचार संहिता’मध्ये पुढे म्हटले आहे की, मोबाइल फोनवर व्यक्तिगत कॉलला उत्तर कार्यालयाच्या बाहेर पडल्यानंतर दिले पाहिजे. मोबाइल फोनवर चर्चा ‘विनम्र’ व्हावी आणि जवळपास असलेल्या लोकांना लक्षात घेऊन ‘कमी आवाजात’ झाली पाहिजे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कॉलला उत्तर उशीर न करता ताबडतोब दिले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.