अंडी विक्रीत किरकोळ व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट..

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

करोना काळात दररोज अंडी खा, प्रोटिन्स खा असे आवर्जून सांगितले जात होते. त्यामुळे मागणी वाढल्याने एप्रिल-मे महिन्याच्या भर उन्हाळ्यात अंड्याचे भाव आकाशाला भिडले होते. आता अंड्याचे उत्पादन वाढले असून आवकही सुरळीत सुरू झाल्याने ठोक बाजारात अंड्याचे दर एक रुपयाने घसरले आहेत. मात्र, किरकोळ बाजारात सात रुपये प्रति अंड्याची विक्री करीत व्यापारी ग्राहकांची लुट करीत आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जात होता. त्यामुळेच भाव वाढलेले होते. आता करोनाची लाट ओसरली असली तरी अंड्याची मागणी कायम आहे. अंड्यांचे उत्पादन नियमित सुरू झालेले आहे. अंड्याची वाहतूक सुरळीत होत असल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे ठोक बाजारात एका अंड्यासाठी ४ रुपये ८५ पैसे प्रति रुपये आकारले जात आहे.मात्र किरकोळ व्यापाऱ्यांना ७ रुपयेच ग्राहकांना मोजावे लागत आहे.

किरकोळ व्यापारीच आता सर्वसामान्य ग्राहकांची लूट करीत असल्याचे चित्र आहे. जाणकारांच्या मते अंड्याचे दरात घसरण झालेली असल्याने किरकोळ बाजारात एका अंड्यांसाठी सहा रुपये आकारायला हवे, किरकोळ व्यापारी अधिकचा नफा कमाविण्यासाठी ग्राहकांची लुट करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.