पत्रकार बाबतीत समस्या एकजुटीने सोडवा – जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे

0

 

ऐनपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेत तालुक्यातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ऐनपूर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रावेर तालुका सभा उत्साहात संपन्न झाली. त्या सभेतील नियोजित विषयप्रमाणे पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार दिलीप वैद्य यांना केळी विषयावर उत्कृष्ठ लिखाण केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार तसेच ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे यांना संगीत जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल दोन्ही जेष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार दिलीप वैद्य, पत्रकार राजीव बोरसे, ऐनपूरचे सरपंच अमोल महाजन, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतोष नवले, ग्रा.जिल्हा कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विनोद कोळी, प्रमोद कोंडे, प्रभाकर महाजन, सचिव इकबाल पिंजारी, कार्याध्यक्ष रवींद्र महाजन, विजय अवसरमल,राजेश चौधरी, सह सल्लागार विजय के अवसरमल, रमेश अवसरमल, अनिल आसेकर, ज्ञानेशवर महाजन,गिरीश नारखेडे,कैलास लवंगडे, दिपक श्रावगे, सुरेश पवार, राजेंद्र सोनार तसेच जिल्ह्याचे व तालुक्याचे पदाधिकारी व सदस्य व पत्रकार उपस्थित होते. विनोद पाल्ले आणि आकाश भालेराव यांची तालुका कार्यकारिणीत निवड करण्यात आली. सूत्रसंचालन इकबाल पिंजारी यांनी तर आभार विजय अवसरमल यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.