Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    • दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नका!
    • आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला
    • अपुऱ्या पाणीपुरवठा योजना १५ दिवसांत पूर्ण करा!
    • मेट्रो-रेल्वे सेवा बंद ठेवल्याने सर्वोच्च न्यायालय नाराज
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाची चर्चा कायम
    मनोरंजन

    शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाची चर्चा कायम

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 15, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan) याच्या ‘पठाण’ (Pathan) या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. तब्बल चार वर्षांनंतर शाहरूख मोठ्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. त्यामुळे किंगखानचे चाहते खूप उत्सुक आहेत. भारतासोबतच दुबईतही (Dubai) ‘पठाण’ची चर्चा आहे. काल रात्री दुबईच्या बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) ‘पठाण’चा ट्रेलर दाखवण्यात आला. यावेळी शाहरूखही उपस्थित होता. पडद्यावरचा त्याचा रोमान्स, ॲक्शन पाहून चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

    बुर्ज खलिफावर ‘पठाण’चा ट्रेलर झळकला आणि जमलेल्या सर्वांनी एकच जल्लोष केला. शाहरूखने चाहत्यांना अभिवादन केलं. शिवाय त्याची सिग्नेचर पोजही केली. सोशल मीडियावर या दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याठिकाणी किंग खानला मिळालेला प्रतिसाद पाहता दुबईतही शाहरुख, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहमच्या (John Abraham) ‘पठाण’ची किती हवा आहे, हे दिसतं. शाहरुखचे कौतुक करताना चाहते थकत नाही. व्हिडिओ समोर आलेत ज्यामध्ये शाहरुख त्याच्या पठाणमधील गाण्यांवर नाचतांना दिसत आहे.

    शाहरुख, दीपिका आणि जॉन यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘पठाण’ हा सिनेमा येत्या २५ जानेवारीला हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख या सिनेमातून जवळपास ४ वर्षांनी कमबॅक करतोय. याआधी तो २०१८ साली झिरो सिनेमात दिसला होता.पण झिरो चित्रपट सुद्धा मोठया पडद्यावर फ्लॉप ठरला. ‘पठाण’ सिनेमाच पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. यानंतर ‘पठाण’चं बेशरम रंग गाणं रिलीज झालं आणि हा सिनेमा वादात सापडला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Burj Khalifa Deepika Padukone Dubai John Abraham Pathan Shah Rukh Khan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

    October 12, 2026

    ‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

    October 8, 2026

    जळगावमध्ये २ ऑक्टोबरला ‘शिक्कामोर्तब’ची मेजवानी

    September 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif