जी. एच. रायसोनी महाविद्यालयात रंगला पतंगोत्सव

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

हीप हीप हूर्रे, कमॉन चिअर अप अशा शब्दांत स्पर्धकाला प्रोत्साहन देत, संगीताच्या तालावर जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पतंगोत्सव रंगला.

 

रायसोनी इस्टीट्युटने आयोजित केलेल्या पतंगोत्सवातील पतंग बनवा स्पर्धेत गायत्री चावरे व विदिशा सोनावणे या विध्यार्थीनिनी बाजी मारली तर सानिका राणे हिने दुसरा क्रमांक पटकावला, तसेच तिस-या क्रमांकावर धनश्री जाधव या विद्यार्थिनीने आपले नाव कोरले. शांतता आणि आशा-आकांक्षांचे प्रतीक असलेल्या पतंगोत्सवाचा आनंद तरुणांनी तसेच त्यांच्या पालकांनीही घेतला. डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनने आयोजित केलेल्या या पतंगोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. कोस्तुव मुखर्जी, एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख आदींची उपस्थिती होती. यांच्याच हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. पतंगोत्सव ही अनोखी संकल्पना आहे. सर्वांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणात रायसोनी इस्टीट्युट साजरा करतो असे यावेळी संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल म्हणाले.चार तास चाललेला हा पतंगोत्सव व स्पर्धा चैतन्य आणि उत्साहाचे प्रतीक बनली यावेळी डान्स व म्युझिक क्लबच्या विध्यार्थ्यानी आपली कला सादर केली. कॉलेज तरुणांनी तर या पतंगोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलाच; पण मोठ्यांनीही पतंग उडवून बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रिया कोगटा यांनी केले तसेच प्रा. कल्याणी नेवे, प्रा. रुपाली ढाके, प्रा. विनोद महाजन, प्रा. करिष्मा चौधरी, प्रा. सरिता चरखा यासह आदि प्राध्यापक व प्रध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

 

कॉन्फिडन्स होताच – गायत्री चावरे

अन्य स्पर्धांच्या तुलनेत ही स्पर्धा उत्साही आणि आनंद देणारी ठरली. मीच जिंकेन हा कॉन्फिडन्स मला होताच. पतंग बनवण्याचेही तंत्र असते आणि सामाजिक संदेश देणे कसब असते. मी त्यात यशस्वी ठरलो.

 

स्पर्धेचा आनंद घेतला – विदिशा सोनावणे
मी खरे तर पतंगबाजीचा आनंद घ्यायला आलो होतो; पण इथला उत्साह पाहिला आणि स्पर्धेत भाग घेतला. प्रतिर्स्पध्यांना चान्स न देता मी माझे कसब दाखवत यश मिळवले.

Leave A Reply

Your email address will not be published.