बाळासाहेब ठाकरे चषक ‘जळगांव जिल्हा श्री अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगांव जिल्हा बॉडिबिल्डर्स असोसिएशन व श्री साई बजरंग जिम यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरे चषक १९ वी ‘जळगांव जिल्हा श्री २०२३ भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन २३ जानेवारी २०२३ रोजी जळगांव येथील श्री साईबजरंग जिमचे पटांगण येथे करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष मोहन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यामध्ये भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या नियमाप्रमाणे वजन गट- ० ते ५५ कि. ग्रॅम, ५६ ते ६० कि.ग्रॅम, ६१ ते ६५ कि.ग्रॅ., ६६ ते ७० कि. ग्रॅ, ७० कि. ग्राम वरील असे एकुण ५ वजनी गट राहतोल
या गटात बक्षिसे अनुक्रमे १ ते ५ क्रमांक विजयी स्पर्धकांना रोख रक्कम देण्यात येणार आहे.
यात प्रथम क्रमांक रु.५००१/-, द्वितीय क्रमांक रु.४००२/- तृतीय क्रमांक रु.३००१/-, चतुर्थ क्रमांक रु. २००१/-, पंचम क्रमांक रु. १००१/- तसेच स्मृतिचिन्ह, टी-शर्ट व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येईल.

एकमेव विजयी स्पर्धकास बाळासाहेब ठाकरे चषक २०२३’ रोख रक्कम रू. २१०००/- देण्यात येईल. तसेच बेस्ट पोझर रू.५००१/-, मोस्ट इम्प्रूव्हड रू. ५००१/- तसेच स्मृतिचिन्ह, टी-शर्ट व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात येईल.

स्पर्धेचे स्टेज भव्य रंगमंच २५४३० फुटाचे राष्ट्रीय स्तराचे स्पर्धेकरीता वापरण्यात येणारे भव्य रंगमंच डिजीटल स्क्रीन, विशिष्ट प्रकारचे प्रकाश संयोजन, उच्च प्रतिचे साऊंड सिस्टीम्स, स्पर्ययांची रंगमंचासमोर प्रेक्षक व खेळाडूंची वेगवेगळी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्पर्धेचे नियोजनकरिता विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.
स्पर्धा आयोजन समिती महापौर जयश्रीताई महाजन ,उपमहापौर कुलभूषण पाटील, सुनिल महाजन, गजानन मालपुरे, . शरद तायडे, . बाळासाहेब कंखरे, विजय बांदल, . विराज अशोक कावडिया आदी .

बक्षिस वितरण समिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ना. गिरीष महाजन, संजय सावंत . आ. राजूमामा भोळे, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, डॉ. शिवराज मानसपुरे,

रंगमंच देखरेख समिती :- प्रा. हरिश्चंद्र सोनवणे, अक्षय मोहन चव्हाण , राजेश बिन्हाडे,

बक्षिस वितरण सहाय्यक समिती :- अविनाश ठाकुर, वैभव देवरे, कुणाल बाविस्कर, यशोधन टेन्ट देखरेख समिती :- श्री. विकास जोशी, श्री. दिप जोशी, आकाश मोरे, दिप जोशी. आकाश सनस, परेश पाटील, यश शेळके

खेळाडू भोजन देखरेख समिती :- सत्यवान जाधव, चंद्रकांत जाधव, हर्षल पाटील, सोनू चव्हाण, हेमंत चव्हाण, ओम शिपी.
मोरे, जितेंद्र जाधव.
प्रमुख पाहुणे व्यवस्था समिती:- मोहन एन. चव्हाण, जयेश चौधरी, जावेद शेख (रावेर). नाशीर शेख दादामियां, ईश्वर सोनार, सचिन पाटील, हर्षल ब्रह्मे, दिनेश महाजन.

Leave A Reply

Your email address will not be published.