काय सांगता ! आता म्हशींचेही आधार कार्ड बनणार; मोदींची घोषणा

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतात प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड (Aadhar Card) अनिवार्य आहे. आता म्हशींचे देखील आधार कार्ड (Aadhaar card for Buffalo) बनणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घोषणा केली आहे.

मोदींनी केली घोषणा 

नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाच्या उद्धाटनावेळी त्यांनी ही घोषणा केली. सर्व दुग्धजन्य प्राण्यांचे आधार कार्ड बनविले जाणार आहे, असे ते म्हणाले. भारतातील डेअरी क्षेत्राला विज्ञानाशी जोडून त्याचा विस्तार केला जात आहे. भारत दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डाटाबेस तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक जनावराला टॅग केले जात आहे, असे ते म्हणाले.

पशु आधार

आधार कार्ड बनवण्यासाठी बायोमेट्रिक माहिती लागते. म्हणजे बोटांचे ठसे, डोळे आदी माहिती घेतली जाते. याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राण्यांची बायोमेट्रिक माहिती घेतली जाणार आहे, असे मोदी म्हणाले. पशु आधार (Pashu Aadhar) असे या मोहिमेचे नाव देण्यात आले आहे. जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासोबतच दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ विस्तारण्यास मदत होईल, असे देखील मोदींनी सांगितले.

बन्नी म्हशीचा किस्सा

गुजरातमधील कच्छमध्ये बन्नी म्हैशीची प्रजाती आहे. या म्हशीचा मोदींनी एक किस्सा सांगितला आहे. दिवसा तिथे खूप ऊन असते. यामुळे ही म्हैस रात्रीच्यावेळी चरते. ती चाऱ्यासाठी गोठ्यापासून 15 ते 17 किमीचा प्रवास करते. परंतू दिवस उजाडू लागताच ती परत तिच्या गोठ्यात वाट न चुकता येते. बन्नी म्हैस गोठा किंवा रस्ता चुकल्याचे खूप कमी ऐकू येते. परदेशातून आलेल्या आमच्या मित्रांना हे ऐकून धक्का बसेल की ती जेव्हा चरायला जाते तेव्हा तिचा मालक किंवा गुराखी त्यांच्यासोबत नसतो. वाळवंटात पाणी कमी असते परंतू, त्या पाण्यातही तिचे भागते, असे मोदी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.