गुढीपाडव्याच्या दिवशी पारोळ्यातील बालाजी मंदिरात छप्पन भोग कार्यक्रम

0

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा येथे गुढीपाडव्यानिमित्त बालाजी मंदिरात छपन्नभोग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . याबाबत अधिक माहिती अशी की शहराचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराज मंदिरात गुढीपाडवा तथा मराठी नववर्षानिमित्त छप्पन भोग नैवेद्यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री बालाजी संस्थान व श्री व्यंकटेश महाप्रसाद समितीच्या वतीने यावर्षी देखील मंदिरात सलग दुसऱ्या वर्षी श्री बालाजी महाराज यांना बुधवार दिं २२ मार्च गुढीपाडवा या मराठी नववर्षाच्या निमित्ताने छपन्न भोग नवैद्यचा कार्यक्रमसह इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात मंगळवार दिं २१ मार्च रोजी रात्री साडे आठ ते साडे अकरा ह भ प भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम तसेच रात्री १२ वाजता नव वर्षाचे स्वागत, २२ मार्च गुढीपाडवा रोजी सकाळी ७ ते १० श्री चा अभिषेक, दुपारी १२ वाजता भोग आरती, १२ ते ७ छपन्न भोग व श्रींचे दर्शन, सायंकाळी ८ वाजता शेज आरती, गुरुवारी २३ रोजी सकाळी ८ वाजे पासून छपन्न भोग महाप्रसादाचे वाटप होणार आहे. यासर्व कार्यक्रमांचे भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आहावन महाप्रसाद समितीचे अध्यक्ष माजी खासदार ए टी पाटील, संस्थान प्रमुख विश्वस्त श्रीकांत शिंपी, रमेश भगवती, प्रकाश शिंपी, दिलीप शिरूडकर,विश्वास चौधरी, किरण वाणी, डॉ अनिल गुजराथी, दिनेश गुजराथी, केशव क्षत्रिय, बापू कुंभार, गुणवंत पाटील, प्रवीण कोळी, प्रमोद शिरोळे, अमोल वाणी यांनी केले आहे. दरम्यान या छपन्न भोग कार्यक्रमाची महाप्रसाद समिती सदस्यांच्या वतीने पूर्व तयारी ही सुरू आहे. अनेक भाविक भक्त हे स्वयंप्रेरणेने भोग नेवैद्य हे बनवून देत आहेत. तसेच अनेक नागरीक या पवित्र कार्यास सेवा देत आहेत. ज्यांना काही सेवा द्यायची इच्छा असेल त्यांनी सदर महाप्रसाद समिती सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.