चाळीसगाव , लोकशाही न्युज नेटवर्क
सेवानिवृत्तीनंतर दिलासा देणारे धोरण असले पाहिजे यात कुठलेही दुमत नाही. यासाठीच आपण सर्व एकच मिशन जुनी पेन्शन या लढ्यासाठी रस्त्यावर उतरला असून आपल्या संपाला माझा पाठिंबा आहे. एकीकडे लढा सुरू ठेवत आपण आपल्या सक्षम प्रतिनिधींकडून राज्य शासनाकडे योग्य सकारात्मक भूमिका मांडत राहावी. आपण आयुष्यभर आपली सेवा देणार आहेत. यासाठी आपण सर्व जण हक्क मागत आहेत. परंतू येत्या काळात आपल्या हक्कांसोबत जबाबदारीची जाणीव देखील समाजासोबत सरकारला व आपल्याला घेणे गरजेचे असून ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. येत्या चार-पाच दिवसात केंद्र सरकारच्या पटलावर आपला विषय मांडण्यासाठी मी प्रयत्नशील असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन आपल्या लढाबाबत भूमिका मांडेल. अशी भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आज चाळीसगाव येथे तहसीलदार कार्यालयासमोर खासदार उन्मेश पाटील यांनी संपकरी बंधू भगिनींची भेट घेतली . यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला तुषार निकम यांनी संपाबाबत भूमिका मांडली.
रुपेश पाटील यांनी या संपाबाबत आपण भूमिपुत्र या नात्याने केंद्र सरकारकडे आमचा आवाज पोहोचवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी श्रीमती सोनल साळुंखे, कामिनी पाटील,पल्लवी गरुड, राजश्री वाघ, प्रफुल्ल पाटील, अजय सोमवंशी, अजय देशमुख, तुषार निकम, प्रवीण वाबळे, अजित खाटीक, तुषार चव्हाण, रुपेश पाटील, सचिन पाटील, संजय शिंदे, हेमंत मोरे, विलास पाटील, सुमित ब्राह्मणकर, गणेश लोखंडे, सी सी वाणी सर, हेमंत कुलकर्णी, जितेंद्र पवार, सचिन वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल पाटील तर आभार राजश्री वाघ यांनी मानले. यावेळी संपकरी बंधू भगिनींनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी मागण्यांचे निवेदन खासदार उन्मेश दादा पाटील यांना देण्यात आले.