पारोळा पोलिसांनी जप्त केलेले एक लाख रुपये केले परत…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरातील शेवडी गल्ली येथील भैय्या सुदाम चौधरी यांच्या मालकीच्या २५ बकऱ्या चोरीस गेल्या होत्या याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस स्टेशनला बकरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनखाली पो.ना प्रवीण पाटील, यांनी पो.ना संदीप सातपुते, पो.कॉ अभिजित पाटील, पो.कॉ किशोर भोई, पो.कॉ राहुल पाटील, पो.कॉ राहुल कोळी, पो.कॉ हेमचंद्र साबे यांनी तपास करून एकूण १० शेळ्या जप्त केल्या व इतर १५ शेळ्या चोरट्यांनी विकून टाकल्याचे नमूद करण्यात आले होते.

संबंधित चोरीतील शेळ्या विक्रीतील रोख एक लाख रोख रुपये तपासात पोलिसांनी हस्तगत केले,  गुन्ह्यात महेंद्र गणेश सुदाम पाटील, वाल्मिक भगवान पाटील, संजय सोमा पाटील, अंकुश नेहरू पाटील, रोशन मराठे  सर्व रा. पळासखेडे ता. पारोळा, शिवाजी रामराव पाटील जामोद. चोरीच्या शेळ्या घेणारे मोहम्मद शरीफ शहा सिराज शहा रा. सिल्लोड जिल्हा औरंगाबाद तसेच २ विधी संघर्ष बालक असे एकूण ९ जण आहे. संशयितांना निष्पन्न करून मुद्देमाल जप्त केला होता. त्या पैकी १० शेळ्या जप्त करुन १५ शेळ्यांचे रोख एक लाख रुपये न्यायाधीश के के माने, पारोळा कोर्ट यांच्या आदेशावरून रोख एक लाख रुपये फिर्यादिस पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व मुद्देमाल कारकून आम्रपाली पालवे यांनी परत केला.

Leave A Reply

Your email address will not be published.