दयाळूपणा सम्यकत्वाचे लक्षण होय…

0

 

प्रवचन सारांश – 23. 09. 2022

दयाळूपणा हा गुण सम्यकत्वाचे लक्षणे सांगणारा आहे. दया, करुणा भाव प्रत्येकाl यावा या संदर्भात अनेक उदाहरणांचा दाखला देत समकत्वाबाबत आजच्या प्रवचनात चर्चा करण्यात आली. करुणावान व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होत असतो असे उदाहरण त्यांनी दिले.

जळगाव येथील स्वाध्याय मनन येथे जयगच्छाधिपती १२ वे पट्टधर आचार्य श्री पू. पार्श्वचंद्र जी म.सा., डॉ. पदमचंद्र जी म.सा. आदिठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये जयपुरंदर मुनी व जयधुरंधर मुनी यांची मेरीभावना तसेच आगम शास्त्रावर प्रवचन श्रृंखला सुरू आहे.

आजच्या प्रवचनात मैत्री, करुणा, प्रमोद व माध्यस्त हया चार भावना जैन दर्शनमध्ये सांगितल्या आहेत असा उल्लेख करून जगात ४ प्रकारचे लोक असतात. त्यामध्ये क्रूरता, इर्षा, करुणा आणि प्रमोद किंवा मैत्री भाव ठेवणारे असतात. आगम शास्त्रात दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव वाचविणारे अनेक थोर पुरुषांचे उल्लेख आहेत. सगळ्यात जास्त करुणावान कोण? हाडामांसाचा हा माणूस खरोखर आहे का याची परीक्षा घेतली. राजा मेघरत यांच्या दृष्टी समोर एक कबुतर व त्याच्या शिकारीसाठी पाठलाग करणारा बाज पक्षी दिसतो. ज्याला शरण आलो ती व्यक्ती भले आपला जीव धोक्यात घालेल परंतु शरणागताचा जीव वाचवेलच अशा बाण्याचे असतात. शरणागत भाव, करुणा भाव एकत्र आले की चांगले घडते. वर्तमान काळात करुणा भाव कमी होत आहे याबाबत प्रवचनात सांगून आठ प्रकारच्या दया प्रकाराची चर्चा त्यांनी केली. त्यात स्वकाय, परकाय, द्रव्य, भाव, व्यवहार, निश्चय, स्वरूप आणि अनुबंध दया असे प्रकार पुज्य जयपुरंदर मुनी यांना सांगितले. आगम शास्त्र प्रवचनात डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयधुरंधर मुनी यांनी रत्नादेवी व दोघे भाऊ जीनरक्षीत व जीनपाल यांची कालची धार्मिक कथा पुढे सांगितली. त्या दोहोंच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार होती. जर कुणी बजावले तर जी गोष्ट करू नये ती गोष्ट हटकून करायचे मन होते. दक्षिणेकडे जाऊ नका असे रत्नादेवींनी सांगितले. ते दोघे दक्षिणेकडे पोहोचले. तीथे एक झाडावर टांगलेली व्यक्ती दिसली. ती म्हणाली की, मी या द्विप मध्ये तुमच्या सारखाच पोहोचलो.  मी देखील रत्नादेवीचे ऐकले नाही. तुम्ही पण ऐकले नाही. रत्नादेवीच्या प्रकोपापासून कसे वाचायचे हा उपाय या दोहोंना मिळाला. तुम्हाला वाचायचे असेल तर तुमचे मन दृढ असावे असे त्यांना त्यांच्या जीव वाचविणाऱ्या यक्षाने सांगितले. चंपानगरी च्या दिशेने यक्षाने दोहोंनापाठीवर बसवून उडवत नेले. रत्ना देवीला समजले की ते दोघे आपल्या तावडीतून निसटत आहेत. त्यांचा पाठलाग करू लागली, यक्ष आपला रक्षक आहे त्यांनी मनाला पक्का निग्रह केला. जीनरक्षीत चलबिचल  झाला. यक्षाने जाणते त्याने जीवरक्षीतता फेकून दिले. मनाने कच्चा असलेला जीनरक्षीतचा मृत्यू झाला. जीनपाल दीक्षा घेतात व संथारा संलेखना मुक्त झाला सिद्धबुद्ध मुक्त झाला असे अत्यंत प्रभावी प्रवचन त्यांनी केले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची मेरी भावनाही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर

 

Leave A Reply

Your email address will not be published.