पारोळा पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा येथील तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या आठ गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात दिग्गज राजकीय मंडळींच्या गणात राखीव आरक्षण निघाल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला असून आता या दिग्गज मंडळीना नवीन गण शोधावा लागणार आहे. आज सोडतीत आरक्षित गण पुढील प्रमाणे-

देवगाव गण अनुसूचित जाती स्त्री वर्गासाठी राखीव तर वसंत नगर अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव निघाली आहे. तामसवाडी गण नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग स्त्री प्रवर्गासाठी राखीव तर शिरसोदे गण सर्वसाधारण स्त्री साठी राखीव आहे. मंगरूळ गण नागरिकांचा मागासवर्गीय पुरुष प्रवर्ग झाला असून शिरसमणी सर्वसाधारण प्रवर्ग, शेळावे गण सर्वसाधारण प्रवर्ग व म्हसवे गण हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला आहे.

लोकेश देविदास बारी या लहान मुलाच्या हस्ते  ईश्वर चिट्ठी काढून ही आरक्षण सोडत काढण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी तृप्ती धोडमिसे (IS) उपजिल्हाधिकारी धुळे या होत्या. तर त्यांना सहाय्यक म्हणून पारोळा तहसीलदार अनिल गवांदे हे होते. त्याचप्रमाणे बैठकीचे सूत्रसंचालन निवासी तहसीलदार राहुल मुडीक यांनी केले.  बी. आर. शिंदे नायब तहसीलदार संजय गांधी, एस. पी. पाटील नायब तहसीलदार निवडणूक शाखा, यांच्यासह दिनेश भोई, महेश जाधव यांनी काम पाहिले. या सोडती दरम्यान विविध पक्षाचे प्रतिनिधी व इच्छुक उमेदवार  उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.