Tuesday, May 24, 2022

डॉ. हर्षल माने क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

पारोळा तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा डॉ. हर्षल माने क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन आज सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या हस्ते पारोळा शहरातील सावित्रीबाई स्टेडियमवर पार पडला.

- Advertisement -

आज पासून सलग पंधरा दिवस हे क्रिकेट सामने खेळविले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या स्पर्धेत प्रथम बक्षीस म्हणून ४१ हजार रुपये डॉ. हर्षल माने यांच्या कडून तर द्वितीय बक्षीस संदीप गिरासे २१००० तृतीय बक्षीस राहुल बाविस्कर १५००० चतुर्थ बक्षीस प्रशांत बाविस्कर (अनु) ११ हजार रुपये या स्पर्धेदरम्यान ट्रॉफी व मेडल दिले जातील ते प्रशांत (गोलू) नागदेव सामाजिक कार्यकर्ता केतन पाटील सामाजिक कार्यकर्ते भोंडण यांच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तसेच इतर बक्षिसे यशवंत चव्हाण संचालक दिवाज् फॅशन स्टोअर्स यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहेत.

या स्पर्धेचे आयोजन गोपी कमल फाउंडेशन पारोळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, अण्णा चौधरी, दौलत पाटील, गोपाल देशमुख, बाळासाहेब पाटील, राकेश करोसिया, राजू महाजन, स्वप्नील बोरसे, गोरख सूर्यवंशी, प्रा. शैलेश पाटील उपस्थित होतेे. क्रिकेट स्पर्धेदरम्यान दररोज २ ते ३ संघांना खेळण्याची संधी मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

तरी जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या क्रिकेट स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या