महाराष्ट्र साहित्य परिषद चाळीसगाव शाखेची कार्यकारणी जाहीर

0

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क

कार्यरत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा चाळीसगांव ची सन-२०२१ ते २०२६ या पाच वर्षांसाठीची कार्यकारणी व विश्वस्त मंडळाची दि.२०-१-२०२२ गुरुवार रोजी निवड करण्यात आली. याकामी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगावचे संस्थापक अध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य आणि जळगाव जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य तानसेन जगताप यांच्या अध्यक्षतेत दि.१८-१-२०२२ रोजी शाखा कार्यालयात संपन्न झालेल्या सहविचार सभेत नेमणूक केलेल्या त्रिसदस्यीय समितीत माजी कार्याध्यक्ष, प्रमुखकार्यवाह आणि कोषाध्यक्ष अनुक्रमे मनोहर ना. आंधळे, गणेश आढाव व ग्रंथमित्र अण्णा धुमाळ यांनी गेल्या पाच वर्षातील शाखेची वाटचाल व त्यासाठी कार्यरत असलेले पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांसह विश्वस्त मंडळाने दिलेले योगदान आणि सद्यस्थितीत सभासदांची शाखेकडून असलेली अपेक्षा याविषयी अध्यक्षांशी सखोल चर्चा केली.

शाखा कार्यालयात २० जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ठिक ६.३० वाजता शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप यांच्या अध्यक्षतेत त्रिसदस्यीय समितीने निवड केलेल्या नूतन कार्यकारणी सदस्यांना निमंत्रित करुन याच सदस्यांच्या सहविचाराने नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. चाळीसगांव शाखेच्या कार्याध्यक्ष पदी कवी- मनोहर ना. आंधळे, प्रमुखकार्यवाह पदी नितीन अर्जुन खंडाळे, उपाध्यक्ष द्वय पदी अनक्रमे गणेश आढाव आणि ग्रंथमित्र अण्णा धुमाळ तर कोषाध्यक्ष पदी रामचंद्र भगवान गोसावी आणि कार्यवाह पदी वंदना रमेश रोकडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

या नूतन कार्यकारणीसाठी निवड करण्यात आलेले सदस्य अनुक्रमे प्रा. अशोकराव वाबळे, प्राचार्य बारकू लक्ष्मण ठाकरे, शालिग्राम निकम, कवी- विश्वास देशपांडे, गोरख एन. ढगे, श्रीमती नलिनी पाटील, दिलिप जाने, मधुकर कासार आणि सुधिर सुरसिंग देवरे यांना नूतन पदाधिकाऱ्यांसह संस्थापक अध्यक्षांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

तदनंतर येत्या पाच वर्षांसाठी विश्वस्त मंडळ अध्यक्षपदी डॉ. सुनील राजपूत, कार्यकारी विश्वस्तपदी पत्रकार किसनराव जोर्वेकर यांची आणि विश्वस्तमंडळाच्या सदस्यपदी अनुक्रमे सर्वश्री उत्तमराव काळे, प्रा.डॉ. हिरामण करंकाळ, उद्धवराव महाजन, गझलकार- शिवाजीअप्पा साळुंखे यांचेसह डॉ. उज्ज्वला देवरे यांच्या नावाची घोषणा नूतन कार्याध्यक्षांनी केली.

या सभेच्या प्रारंभी पूज्य साने गुरुजी लिखित ‘खरा तो एकचि धर्म’ ह्या प्रार्थनेचे समुहगायन करण्यात येऊन सोबतच नूतन कार्याध्यक्ष कवी मनोहर ना. आंधळे यांनी स्वतः लिहिलेले म.सा.प. शाखा गीत सादर करुन उपस्थितीत चैतन्य निर्माण केले. सूत्रसंचलन नूतन उपाध्यक्ष गणेश आढाव यांनी केले तर नूतन प्रमुखकार्यवाह नितीन खंडाळे यांनी आभार व्यक्त केलेत.

Leave A Reply

Your email address will not be published.