पारोळ्यात अनोळखी महिलेने स्वतःला जाळून घेत केली आत्महत्या…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पारोळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वाकड्या पुलाजवळ पस्तीस ते चाळीस वयाच्या अनोळखी महिलेने जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा कजगाव रस्त्यावरील वाकड्या पुलाखाली एका अज्ञात महिलेने वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना आज   पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

पारोळा पोलिसांनी या महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान केले आहे. याबाबत आज साडेचार वाजेच्या सुमारास बिसलेरी बॉटल मध्ये पेट्रोल भरून आणून वाकड्या पुलाजवळ भोसले पोल्ट्री फार्मच्या शेजारी स्वतःच्या अंगावर टाकून दगडावर बसून जाळून घेत आत्महत्या केली. तिच्या अंगावर लाल कलरची साडी वेगवेगळे ठिपके असलेली, गळ्यात मंगळसूत्र, पायात चप्पल अशी सुशिक्षित घराण्यातील महिला असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका चालक ईश्वर बाबा ठाकूर आशुतोष शेलार पोलीस निरीक्षक सुनील जाधव पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे किशोर भोई व कर्मचारी यांनी पंचनामा करून सदर महिलेने आणलेली पेट्रोलची बाटली तसेच कपड्याचे नमुने व चप्पल ताब्यात घेतले असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.