सरपंच पतीस मारहाण, २४ जणांवर गुन्हा

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा तालुक्यातील पिंप्री प्र.ऊ येथील सरपंचच्या पती व घरातील नातेवाईकांना मारहाण केल्याप्रकरणी २४ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंप्री प्र ऊ येथील सरपंच  पुष्पा रामकृष्ण पाटील यांनी पारोळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, दिनांक २८ रोजी नऊच्या दरम्यान पिंप्री प्र.ऊ. (ता.पारोळा) येथे रामकृष्ण पाटील, मयूर पाटील यांना गावातील प्लॉट भागात राहणारे सुनील पगारे, रामभाऊ भिल, रणजीत भिल, राजू भिल, विजय मालचे, राजू भील, अजय भील, अविनाश भिल, गोपाल भिल, अजय गायकवाड, रोहित भिल, शैलेंद्र पगारे, विशाल भिल, राहुल भिल, प्रवीण भिल, अनिल भिल, भैय्या भिल, भिकन पगारे, संदीप पगारे, पिंटू भिल, खंडेराव भिल, शैलेश पगारे,अर्जुन पगारे, सचिन पगारे यांनी एकत्र येऊन हातात लाठ्या काठ्यांनी व लोखंडी सळईने मारहाण केली.

तसेच गावातील प्रमोद पाटील व त्यांचा मुलगा प्रेम पाटील यांना देखील मारहाण केली. ग्रामपंचायत सदस्या यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे वरील सर्वांवर पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.