Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»आ.चिमणराव पाटलांच्या हस्ते पारोळा बसस्थानक परिसराचा काँक्रीटीकरणाचे उद्घाटन…
    जळगाव जिल्हा

    आ.चिमणराव पाटलांच्या हस्ते पारोळा बसस्थानक परिसराचा काँक्रीटीकरणाचे उद्घाटन…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 26, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    अनेक वर्षांपासून शहरातील बस स्थानकात कांक्रिटीकरण व्हाहे अशी मागणी बस स्थानक परिसरातील व्यापारी, रिक्षाचालक संघटना व तसेच शहरातील विविध सामाजिक संघटनांनी केली होती. या सर्वांच्या मागणीचा विचार करून पारोळा-एरंडोल चे आमदार चिमणराव पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून या कामासाठी दिड कोटी रुपये खर्च मंजूर करून घेतला, या कांक्रिटीकरणाचे आज भुमिपुजन आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

    याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा शहरातील बस स्थानकात कांक्रिटीकरण झाले नव्हते, म्हणून या कामासाठी मंजुर १.५० कोटी रूपयांच्या विकासकामाचा भुमीपुजन सोहळा आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते झाला. सोबत जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतुक अधिकारी दिलीप बंजारा, विभागीय अभियंता अक्षय महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. हे बसस्थानक झाल्यापासुन आजवर खड्ड्यांमुळे प्रवासी, बसचालक, रिक्षाचालकांसह या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यापारी बांधव व शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती, तसेच या बसस्थानकावरून रहदारी वाहनांमुळे आजुबाजुला धुळीचे साम्राज्य होत होते व पावसाळ्यात मोठा चिखल येथे साचत होता, त्यामुळे अनेक प्रवाशांचा तोल जाऊन त्यांना ईजा होत होती, परंतु आता या कामाच्या भुमीपुजनामुळे हे काम पूर्ण होणार असून या सर्वच समस्यांना आळा बसणार आहे. यावेळी स्थानिक छोट्या-मोठ्या व्यापारी बांधव व श्री बालाजी रिक्षा युनियन तर्फे आ. चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.

    यावेळी बाजार समिती मा.संचालक चतुर पाटील, जिजाबराव पाटील, पोपट चव्हाण, जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, मा.नगराध्यक्ष दयाराम पाटील, जि.प.मा.सदस्य पांडुनाना पाटील, रोहीदास पाटील, मा.उपनगराध्यक्ष रविंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, युवासेना तालुकाप्रमुख राकेश पाटील, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष अरूण पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, शेतकी संघ उपाध्यक्ष नाना पाटील, मा.उपाध्यक्ष सखाराम पाटील यांचेसह बसस्थानक परिसरात व्यवसाय करणारे व्यापारी बांधव, श्री बालाजी रिक्षा युनियनचे सर्व पदाधिकारी, संचालक, विविध गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासो आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, शिवसेना, युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक, पत्रकार बांधव व शहरवासिय उपस्थित होते. याप्रसंगी या भुमीपुजन सोहळ्याचे प्रास्ताविक अमोल पाटील यांनी केले, राकेश शिंदे, रामचंद्र पाटील, दयाराम पाटील, भगवान जगनोर, चतुर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर मुख्य मार्गदर्शन आ. चिमणराव पाटील यांनी केले व सुत्रसंचलन नंदकुमार पाटील  यांनी केले.

    या मनोगतात मतदारसंघात नुसत आमदार म्हणुन मिरण्यासाठी नाही तर मतदारसंघाच पालकत्व करणे आहे, आज त्याच दुरदृष्टीने गेल्या स्वातंत्र्य काळापासुन प्रलंबित असलेल्या नागरिकांचा दैनंदिन आणि भविष्यातील गरजेचा विषयांना मार्गी लावण्याचे माग सुरू आहेत. आज बसस्थानकाचा नुतनीकरणाचे मंजुरीचे काम जसे आपण मार्गी लावले त्याचप्रमाणे आज त्याच बसस्थानकाचा रंगरंगोटीचे काम देखील माझ्याच कार्यकाळात होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. यावेळी मतदारसंघात सद्यस्थितीत सुरू असलेल्या कोट्यावधींचा विकासकामांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला व तसेच सदरील काम हे उच्च प्रतीचे होण्यासाठी विशेष लक्ष देण्याचा सुचना आ. चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पारोळासह एरंडोलचे देखील बसस्थानक कसे सुसज्ज, प्रवाशांसाठी सर्व सोयी-सुविधा युक्त करता येईल यासाठी पुढे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    Parola Parola MLA Chimanrao Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif