अमृत गृपची देशाप्रती सामाजिक बांधिलकी

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव (Swatantracha Amrut Mahotsav) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून पारोळा (parola)  येथील अमृत कलेक्शन (Amrit Collection) जे नेहमीच देशसेवा असो अथवा सामाजिक कार्य असो यात सदैव अग्रेसर असतात.

अमृत कलेक्शन ने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज व टोपी वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याचे जनमानसात बोलले जात आहे.  याप्रसंगी अमृत कलेक्शनचे संस्थापक अध्यक्ष केशव क्षत्रिय यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या वतीने आयोजित हर घर तिरंगा घर घर तिरंगा हा उपक्रम राबविला जात आहे. देशातील प्रत्येक नागरिकांचा मनात देशभक्तीची भावना निर्माण व्हावी हा उद्देश असुन आपण ही या देशाचे पाईक असुन आपले काही कर्तव्य आहेत. तसेच देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरा वर तिरंगा ध्वज फडकवावा हा उद्देश समोर ठेवून आम्ही अमृत गृप या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर करणाऱ्या आमच्या प्रत्येक सदस्यांच्या घरा वर तिरंगा ध्वज असावा असा उद्देश समोर ठेवून अमृत गृपमधील प्रत्येक कर्मचाऱ्याला तिरंगा ध्वज व टोपीचे वाटप केले.

त्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत व्हावी म्हणून आम्ही हा उपक्रम राबविला आहे. यापुढे ही कधीही देशसेवेत आम्ही सदैव अग्रेसर राहु अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. याप्रसंगी अमृत गृपचे अमृत क्षत्रिय, धर्मेंद्र क्षत्रिय, प्रफुल्ल क्षत्रिय यांच्यासह अमृत गृपचे सर्व महिला व पुरुष कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.