यात्रेसाठी गेलेल्या तरुणाची मोटारसायकल घसरून मृत्यू…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

तालुक्यातील पिंपळकोठा येथे यात्रेसाठी गेलेल्या तरुणाची मोटर सायकल घसरून अपघातात डोक्यास जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील पिंपळकोठा येथील खंडू सोमा महाले यांनी पारोळा पोलिसांना दिलेल्या माहितीवरून दि. १२ रोजी यात्रेनिमित्त मोरफळ येथील हिरालाल रोहिदास मोरे (२५) हा तरुण पिंपळकोठा येथील यात्रा बघून परतत असताना त्याची मोटर सायकल क्रमांक एम. एच. १५ सी एक्स ४७९३ ही गावालगत घसरून सदर तरुण गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला पारोळा येथील रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत करत.

Leave A Reply

Your email address will not be published.