Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»विचखेड्याजवळ अपघातात १६ वर्षीय तरुण ठार; एक गंभीर…
    जळगाव जिल्हा

    विचखेड्याजवळ अपघातात १६ वर्षीय तरुण ठार; एक गंभीर…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 18, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ झालेल्या अपघातात रत्नापिंप्री येथील १६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर ४० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १७ रोजच्या मध्य रात्री घडली.

    याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नापिंप्री येथील पांडुरंग मन्साराम पाटील (४०) व चेतन अरूण पाटील (१६) दोघे मोटार सायकल ने धुळ्याकडे जात असतांना पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ अज्ञात भरधाव वेगात असलेल्या वाहनाने समोरून येणाऱ्या मोटरसायकला धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले त्यात चेतन पाटील हा जागीच ठार झाला. तर पांडुरंग पाटील हे गंभीर जखमी झाले. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी पारोळा पोलिसांना याबाबत माहिती दिली. चेतन पाटील याला पारोळा येथे रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले, तर पांडुरंग पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याने धुळे रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

    मयत चेतन पाटील याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. चेतनच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री या तिन्ही गावात शोककळा पसरली आहे. अवघ्या सोळा वर्षीय चेतनच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळला दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पारोळा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    16 year old boy died accident Parola
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif