पारोळा येथे विजेच्या लंपडावाने नागरिक हैराण

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या राज्यात जिकडे तिकडे पावसाने थैमान घातले आहे. यातच भरिस भर म्हणून की काय महावितरणकडुन विजेचा लपंडाव सुरू आहे.  यामुळे आज पारोळा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात शहरातील नागरिकांनी मोर्चा काढत निवेदन दिले.

पारोळा तालुक्यात मागील काही दिवसांपासून महावितरण कंपनीकडून विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत अनेक तक्रारी करून ही परिस्थिती जैसे थे आहे.  दिवसभरात अनेक वेळा विज पुरवठा खंडित केला जातो आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीच पुर्व सुचना दिली जात नाही. वेळोवेळी फोन करून विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. काम चालू आहे, डिपी जळाली आहे. थोड्या वेळाने विद्युत पुरवठा सुरळीत होईल अशी नेहमीची ठरलेली उत्तरे देऊन वेळ मारुन नेली जाते.

विजेच्या लंपडावाने नागरिक हैराण झाले आहेत हे मात्र नक्की. कधी विज पुरवठा खंडित होईल याची शाश्वती नाही.  यामुळे शहरातील अनेक लहान मोठे विजेवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर वर्क फोम होम काम करणाऱ्यांना याचा जबर फटका बसत आहे.

वेळोवेळी विज पुरवठा खंडित होत असल्याने घरातील अनेक विद्युत उपकरणेही खराब होत असुन अगोदरच पारोळा नगरपालिकेच्या वतीने दहा ते बारा दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जातो त्यातही नळांना पाणी आले की विजपुरवठा खंडित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तरी महावितरणने विज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेच आता सणासुदीचे दिवस असल्याने व शहरातील प्रभु बालाजी महाराजांचा नवरात्रोत्सव व घटस्थापनासारखे मोठे सण येत आहेत. यावेळी विद्युत पुरवठा सुरळीत चालू राहावा अन्यथा जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर शहरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.