पारोळ्यात उपनगराध्यक्षासह नगरसेवकाचा भाजपात प्रवेश

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान व नगरसेवक तथा शिंपी समाजाचे अध्यक्ष मनोज जगदाळे  यांनी चाळीसगाव विधानसभा आमदार मंगेश चव्हाण व भाजपा जिल्हाध्यक्ष हभप जळकेकर महाराज  यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथील उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान व नगरसेवक मनोज जगदाळे यांनी एरंडोल पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख व पारोळा येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपा मध्ये प्रवेश केला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, भाजपा शहराध्यक्ष मनीष पाटील, नगरसेवक पी. जी. पाटील, भैय्या चौधरी, बोळे सरपंच रावसाहेब गिरासे, सांगवी सरपंच प्रवीण पाटील, योगेश पाटील, विजय मेटकर, सुनील शिंपी, कैलास पाटील, ईश्वर ठाकूर, प्रसाद महाजन आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.