शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

0

परोळा तालुक्यातील भोकरबारी येथे ५४ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

भोकरबारी येथील शेतकरी तुकाराम संतोष पाटील (वय ५४) हे शेतकरी ७ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कोणालाही काही न सांगता शेतात निघून गेले. त्यानंतर शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

 

शेतातील कामगारांना तुकाराम पाटील यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही घटना त्यांच्या परिवाराला कळवली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना खाली उतरवण्यात आले. याबाबत राहुल तुकाराम पाटील यांच्या माहितीवरुन पारोळा पोसिलांत घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.