पारोळा तालुक्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

बोळे येथील १८ वर्षीय युवकाने जंगलात झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. रावसाहेब गिरासे यांनी खबर दिली की, १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता दशरथ रामभाऊ भील (वय १८) हा बोळे शिवारात गुरे चारण्यासाठी गेला होता. तो सायं. ६ वाजेपर्यंत घरी न आल्याने त्याचा वडीलांनी आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता, यावेळी तो झाडाच्या फांदीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला त्यास खाजगी वाहनाने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याबाबत पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.