यावल-भुसावळ दरम्यान दुचाकीस्वारांचा भीषण अपघात, २ गंभीर जखमी

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

यावल रस्त्यावर एका पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या तिघांना जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी जखमींवर उपचार सुरु असून, दोघांचीही प्रकृती गंभीर आहे.
पुढील उपचारासाठी जखमींना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविध्यालायाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सूत्रांनुसार, यावल-भुसावळ दरम्यानच्या पेट्रोल पंपाजवळ दुचाकीने केतन हरी पारधे व अबू साले इस्ताक अहमद (४२) हे भुसावळकडे जात असतांना भुसावळकडून ललित भागवत बोंडे (२८, किन्ही, ता. भुसावळ) हे यावलकडे येत असतांना दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या, व तिघेही जागीच कोसळल्याने गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने नागरीकांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्यानंतर डॉ.शिवदास चव्हाण, डॉ.इरफान खान, अधिपरीचारीका माधुरी ठोके, सुमन राऊत, बापू महाजन, अमोल अडकमोल, प्रवीण बारी आदींनी जखमींवर उपचार केले तर, केतन पारधे व ललित बोंडे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने या दोघांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.